हिंदुस्थानातील पहिले विश्वविक्रमी शंखवादकांचे पथक
केशव शंखनाद पथक
हिंदुस्थानातील पहिले विश्वविक्रमी शंखवादकांचे पथक
शंखनाद पथक पुर्ण पणे एक पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक शंख वाद्य संघटीतपणे वाजवणाऱ्याचे पथक
संस्थेची ध्येय / उद्दिष्टे व उपक्रम
१.केशव शंखनाद पथकाचे प्रशिक्षण शिबीर/ वर्ग आयोजित करणे. तसेच नागरिकांना शंख वादना बद्दल
मार्गदर्शन करणे.
२. केशव शंखनाद पथकातील व इतर शंखवादकांचे / संस्थांची एकजूट करणे, केशव शंखनाद पथकामार्फत
शंखवादनाचे कार्यक्रमवेगळ्या ठिकाणी आयोजित करणे.
३. सार्वजनिक धार्मिक, सांस्कृतिक उत्सवात सहभाग घेणे तसेच शंख व पौराणिक वाद्यांचा प्रचार व प्रसार
करणे.
४. उत्कृष्ट शंखवादकांना सन्मानित करणे व पुरस्कार देणे.
५. नविन व पारंपारिक शंखनाद या खेळांचे एकत्रिकरण करून नागरिकांना शंख वादनासाठी प्रोत्साहित करणे.
६. केशव शंखनाद पथकामार्फत राष्ट्रीय उत्सव व सण (१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गोकुळाष्टमी, कार्तिकी
पौर्णिमा,गणेशोत्सव, नवरात्र इत्यादी) साजरे करणे.
७. . महाराष्ट्रातील शंखनाद पथकांचे संघटन व एकत्रित कार्यक्रम आयोजित करणे.
८. शंखनाद पथकाच्या विकासाकरीता निधी संकलन करणे.
९. समाजातील गरीब, पिडीत, वृध्द, जेष्ठ नागरिक यांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदत उपलब्ध
करून देणे.
१०. महाराष्ट्र राज्य व परिसरात आपदग्रस्त , नैसर्गिक संकटात असलेल्यांना मदत करणे.
११. समाजातील दुर्बल, गरीब, असहाय्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय साहित्य मोफत पुरविणे.
१२. खेळांच्या स्पर्धा, व्यायामाचे महत्व, वक्तृत्व स्पर्धा, वनराई देखभाल, व्यक्तिगत विकास यासाठी सानुग्रह
अनुदान देणे.
१३. होतकरू, हुशार, गरीब विद्या कमवा व शिका यासाठी प्रोत्साहन देणे.
१४. सेवा उपक्रम – मठ, मंदिरे ,आश्रम ,शोभा यात्रा व धार्मिक ठिकाणी सेवा भावी वृतीने सेवा देणे.
१५. समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व आरोग्य मार्गदर्शन शिबिरे घेणे.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट, अयोध्या चे, विशेष निमंत्रण प्राणप्रतिष्ठा
आपल्या देशाचे राष्ट्रमंदिर अर्थातच श्रीराम मंदिर, अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान आमच्या केशव शंखनाद पथकास शंखवादनासाठी निमंत्रित केले असून आमच्या सह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हा बहुमान आम्ही समजतो.
अयोध्येच्या श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सप्ताहा मध्ये शंख वाजवण्यासाठी १११ शंख वादकांना आमंत्रित केले गेले होते. केशव शंखनाद पथकाचा डिसेंबर महिना तर सरावासाठी सज्ज होताच पण, १५ जानेवारी पर्यंत हे दिवस सरावासाठी खास तीन ते चार तास श्री ओंकारेश्वर मंदिरात (शनिवार पेठ,) येथे चालू होते. या पंधरा दिवसात मीडिया, फोटोग्राफर आणि पुणेकर यांच्या भेटी दररोजच केशव शंखनाद पथकाला झाल्या. पुणेकरांचा हे प्रेम पाहून मन हर्षून गेले.. कुणी आणि किती जण सांगू की त्यांनी आम्हाला शुभेच्छा रूपी मदत केली, भेटी दिल्या ,सत्कार समारंभ तर पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित करून अगदी उत्साहात झाले. आम्हाला कळले, या या ठिकाणी १११ जणांना सत्कारासाठी बोलावलंय असे कळले तरी खरच खूप छान वाटले. श्री प्रभू रामचंद्रासाठी जे रेशीम वस्त्र विणले गेले ते पुण्यातल्या हातमागावरच दोन धागे राम के लिये... त्यातही हातमागाच्या उद्घाटना समयी केशव शंखनाद पथकाला बोलावले होते.
अयोध्येतील श्रीरामांना भेटण्याची आस सर्वानाच होती.१९९२ च्या सुमारास बाबरी मशीद वाद, मंदिराबाबत चर्चा, वादविवाद ऐकले होते पण आता प्रत्यक्ष ४५०ते ५०० वर्षानंतरचा हा श्रीराम प्रभू रामचंद्रांचा वनवास संपून श्रीराम पुन्हा आपल्या जन्मभूमीत गर्भ गृहात विराजमान झालेत, ही सुवर्णभाग्याचीच गोष्ट होती.
हिंदुस्थानातील पहिले विश्वविक्रमी शंखवादकांचे पथक
गेल्या ९ वर्षांपासून पुणे शहरात केशव शंखनाद पथक म्हणून आम्ही काम करीत आहोत .. पण नक्की शंखनाद पथक म्हणजे काय? तर शंखनाद पथक म्हणजे शंखवाजवणाऱ्यांचे पथक आज पर्यंत आपण फक्त ढोल ताशा पथक, ध्वज पथक,लेझीम पथक असे ऐकूण होतो आणि बघितलंही पण शंखनाद पथक पुर्ण पणे एक पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक शंख वाद्य संघटीतपणे वाजवणाऱ्याचे पथक आहे.
आपली धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक,वाद्यं का व कशा साठी वाजवली जात होती व त्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात यासाठी पथकाच्या माध्यमातून शंखाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने केशव शंखनाद पथकाचे नामकरण केले व पथकाचा मुद्राचिन्ह (लोगो ) हि प्रसिद्ध करण्यात आला. भगवान श्रीकृष्ण चे नावही केशव आहे कि ज्यांनी जगाला गीतेच्या उपदेश देवून समाज घडविण्यासाठी प्रेरणा दिली , अखंड हिंदुस्तानातील हिंदूसमाजाला संघटित करून देव देश धर्मा साठी काम करण्याची शिकवण देवून परम पवित्र भगवा ध्वज आपले गुरू स्थानी ठेवून एकत्रित केलं असे परमपूजनीय संघ संस्थापक आद्यसरसंघचालक मा.डॉ केशवजी हेडगेवार यांच्या हि नावाचा समावेश यामध्ये आहे ह्या नावाने संपूर्ण जगात शंख ध्वनीने परिवर्तन व्हावे असे आम्हाला वाटते. केशव शंखनाद पथक हे एक कुटूंब आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपल्या पथकाच्या मार्फत देव देश धर्मासह शंखाचा प्रचार प्रसार व्हावा असे वाटते.
२०१७ मध्ये गणेशोत्सवात शंखनाद करायचा या उद्देशाने शंखनाद पथकाचा सराव पुणे महानगरातील प्रसिद्ध श्री ॐकारेश्वर मंदीरात एक महिना भर सुरू केला त्यात महिला व पुरुषसंख्या फक्त ५\७ होती नंतर ती वाढतच गेली. पुणे महानगरातील प्रमुख गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहून शंखनाद करीत राहिलो व श्री गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूकीत मानाचे गणपतीनां स्थिर वादन करू लागलो. सुरवातीला नागरिकांना काही कळतंच नव्हते काय चाललंयं हळूहळू सवयीने शंखध्वनीने वेगवेगळे ताल,स्वर ,चाली वाजल्या की मग काहीतरी नविन म्हणून नागरिकांना ते छान वाटू लागले तसेच २०१८ ला पण आम्ही सर्व गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूकी साठी सज्ज राहिलो व शंखनाद केले...
आता पर्यंत शंखनाद पथक नागरिकांना कळून चुकले होते व गेल्या दोन वर्षांत आम्ही शंख वादना विषयी मार्गदर्शन केले होते. शंख वादनाने आपल्या शरीरात व आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात यावर आम्ही लोकांना जागृत करत गेलो, त्याचाच उपयोग शंखवादकांच्या संख्येत झाला. पथकात नाही पण आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते म्हणून बरेच नागरिक शंख वाजवायला शिकवा म्हणून येत होते, आत्ता पर्यंत पथकातील शंखवादक व फक्त शंख वाजवायला शिकणाऱ्यांची संख्या साधारण हजाराच्या वर गेली आहे. याचाच फायदा व सोशलमिडीयाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहचलो.युट्यूब वर आमचे व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर २०१९ च्या जानेवारी महिन्यापासून आम्ही वर्षभर श्री ॐकारेश्वर मंदीरात महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी मोफत शंखवादन प्रशिक्षण वर्ग सुरु केलेत त्यात नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दर्शविला. २०१९ च्या श्री गणेशोत्सवात आम्हाला बऱ्याच मंडळांची शंखवादनासाठी निमंत्रणे येत गेली आणि गणेशभक्तांचा आदर राखून आम्ही शंखवादन हि केले. परंतु पुढे २०२० च्या सुरवाती पासूनच कोविड -१९ चे परिणाम हिंदुस्थानासह जभरात दिसु लागले. शंख वादनामुळे नागरिकांना आपल्या शरीरातील बदला मुळे खूप फायदा झाला.२०२० व २०२१ हे वर्ष पूर्ण आभासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले.
२०२२ या वर्षी कोविड -१९ चे नियम शिथील करण्यात आले व पुन्हा आम्ही परत वर्षभर श्री ॐकारेश्वर मंदीरात महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी मोफत शंखवादन प्रशिक्षण वर्ग सुरु केले त्यात गेली २ वर्ष त्रस्त असलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी शंख वादनाचे महत्व ओळखून आपल्या पथकाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० पेक्षा अधिक नागरिकांनी प्रशिक्षित होऊन शंख वादन करण्यास सुरुवात केली .२०२२ या वर्षी आम्हाला हिंदुस्थानातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यांच्या पहिल्या दिवशी प्राण प्रतिष्ठापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीचा शंखवादन करण्याचामान मिळाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, हुतात्मा बाबू गेणु सार्वजनिक गणपती, असे मानाचे सर्व गणपती यांच्या महाआरतीचे व विसर्जन मिरवणुकीत शंखवादन करण्याचे आम्हाला भाग्य लाभले.
पुणे शहरा बरोबरंच पिंपरी-चिंचवड शहरात देखिल केशव शंखनाद पथकाने शंखनाद केला. उदा. भोसरीचे आमदार मा. महेशराव लांडगे यांच्या लांडगे आळीतील श्रीराम गणेश मंडळ , पिंपरी येथील आसवाणी ग्रुप यांचे इको फ्रेडली गणेश विसर्जन कार्यक्रमाला शंखवादन केले. व शारदीय नवरात्री उत्सवात संपूर्ण नवरात्र विशेष पुणे शहराचे वैभव श्री चतु:शृंगी देवी मंदिरात रोज सकाळी व संध्याकाळी महाआरतीचामान आपल्या केशव शंखनाद पथकाला दिला गेला, तसेच आकुर्डी प्राधिकरण येथील श्री अमितजी गावडे यांचे श्री समर्थ युवा प्रतिष्ठान येथे मोठ्या जोशात शंखनाद झाले.
जानेवारी २०२३ च्या सुरवातीला केशव शंखनाद पथकाला मोठा बहुमान मिळाला तो म्हणजे नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालय रेशीम बाग येथे धर्मभास्कर पुरस्कार हा जगतगुरु शंकराचार्य व थोर मोठे संन्यासी साधू संत महापुरुषांच्या उपस्थित सरसंघचालक मनानीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही सर्व केशव शंखनाद पथकाच्या सदस्यांनी मुख्य व्यासपीठावर शंखनाद करून केली.